शिवसेना उ.बा. ठा. गट पुन्हा सक्रिय होणार ? शिंदे गट व भाजप मधुन काहींचा प्रवेश होणार ?
तळोदा : शहरातील उद्धव ठाकरे गट मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर काहींनी भाजपात प्रवेश केला असल्याने उ.बा.ठा शिवसेना तळोदा शहरात संपणार का ?
अशी स्थिती असताना या जुन्या शिवसेनेला जिवंत करण्यासाठी सध्या

भाजपात असलेले काही नेते व शिंदे शिवसेनेतील काही नेते पक्षाला पुन्हा एकदा शहरात शिवसेनेचे पुनर्जीवन
करणार असून लवकरच त्यांच्या पक्षप्रवेश व पदवाटप करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आपल्या खबऱ्याच्या हाती लागले असून शिंदेसेना कडून होणारे अवमूल्य भाजपात होणारी अवहेलना यामुळे असे सर्व नाराज नेते व पदाधिकारी हे या पक्षात प्रवेश करून येणाऱ्या तळोदा नगरपालिकेची निवडणुकीची उमेदवारी करणार असल्यास आश्चर्य वाटू नये कारण की माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून तो शहरात काही भागात शहरात आज देखील काँग्रेसचे मतदार आहेत मात्र काँग्रेस पक्षात नेताच शिल्लक नसल्याने हे मतदार नेमके कोणत्या बाजूला जातील ?
याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क व अंदाज लावण्यात येत होते मात्र काँग्रेसचे पद्माकर वळवी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी साठी काहींनी पद्माकर वळवी यांची भेट घेतली आहे तर उ.बा.ठा. गट देखील काँग्रेसच्या सोबत येऊन एकत्रितपणे नवीन नोट बांधू शकते असे राजकीय चित्र दिसत आहे येणाऱ्या काळात काय उलाढाली होतील याबाबत आज सांगणे कठीण असले तरी पक्षात होणारी साठमारी कुठेतरी उद्दीग्न होऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल दिसेल हे स्पष्ट आहे…….

