हे राजकीय संस्कार येणाऱ्या पिढीत रुजतील का ?

राजकारणात असणाऱ्या तरुण नेत्यांना आदर्श संदेश देणारी कृती राजकीय संस्कृती आणि संस्कार….. देणारे माजी मंत्री पदमाकर वळवी

आज काल व्यासपीठावर खुर्ची मिळावी म्हणून काहीजण नको ते उपद्व्याप करतात.आयोजकांना सांगून स्वतः चे नाव घ्यायला लावतात आणि स्वतः व्यासपीठावर बसण्यासाठी सोय लावतात. मात्र व्यासपीठा वरील संस्कृती काय असते ? प्रगल्भता आणि समय सूचकता काय असते याचे उत्तम उदाहरण एका खाजगी कार्यक्रमात पहायला मिळाले…..

त्याचे झाले असे की तळोदा येथील आदिवासी संस्कृती भवनात प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्षा व लोकसंघर्ष मोर्चाचा प्रतिभा शिंदे व संजय महाजन यांचे सुपुत्र प्रतीक यांना अमेरिकेमध्ये एका विद्यापीठात पीएचडीसाठी भरघोस असा निधी प्राप्त झाला त्याच्या आनंद व्यक्त करण्यासाठी प्रतिभाताई शिंदे यांनी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रम असला तरी या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी नेत्यांची उपस्थिती दिसून आली ज्या ठिकाणी माजी क्रीडामंत्री पद्माकर वळवी विद्यमान आमदार व माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच आमश्या पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी राजेंद्र कुमार गावित भाजपचे संघटन मंत्री विजय भाऊ चौधरी यांची उपस्थिती होती दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रतीक बाबत स्वतःचे अनुभव एक आई म्हणून त्यांनी सांगितल्यानंतर हळूहळू गर्दी वाढू लागली त्यात व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत होती
व्यासपीठावर माजी मंत्री पद्माकर वळवी माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ.विजयकुमार गावित. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे.जेष्ठ साहित्यिक वाहरु सोनवणे असे सदस्य बसलेले होते. त्याच वेळी आमदार आमश्या पाडवी यांचे आगमन झाले वास्तविक हा कार्यक्रम कौटुंबिक असल्याने छोटे खानी असला तरी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिग्गज लोकप्रतिनिधी आजी-माजी यांची उपस्थिती एकाच वेळी होईल अशी अपेक्षा नसल्याने व्यासपीठावर मर्यादित खुर्च्या होत्या. विद्यमान आमदार आमश्या पाडवी हे आल्यानंतर मात्र कोणाला उठवून यांना बसवायचे ? स्वतः कोण उठेल का ? असा प्रश्न आयोजन समिती समोर उपस्थित झाला हा प्रश्न होता मात्र एक वरिष्ठ मंत्री असून देखील विद्यमान आमदार च्या मान हा मोठा असतो याची जाण ठेवून माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी स्वतः आपली खुर्ची सोडत आमश्या पाडवी यांना बसण्याच्या आग्रह केला वास्तविक अक्कलकुवा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या आमश्या पाडवी विरोधात जे उमेदवार होते त्यात अपक्ष उमेदवार म्हणून स्वतः पद्माकर वळवी हे देखील होते त्यामुळे राजकीय विरोधक जरी असले तरी मानाच्या वेळी योग्य तो राजकीय प्रोटोकॉल पाळणारे वरिष्ठ लोकप्रतिनिधी फार कमी शिल्लक राहिले आहेत त्याचे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणून पद्माकर वळवी यांनी तरुण राजकीय नेत्यांसमोर तरुण कार्यकर्त्यांसमोर एक उत्तम उदाहरण दाखवून दिले दरम्यान हे चित्र ज्यांनी डोळ्यांनी पाहिले त्यांच्या पद्माकर वळवी यांच्या मनाचा मोठेपणा बद्दल कार्यक्रम स्थळी एकच चर्चा होती. हा छोटा प्रसंग राजकारणात येऊ पाहणारे हौशी तरुणांसाठी एक उत्तम संदेश देणारा आहे
या कार्यक्रमात नंतर चिरंजीव प्रतीक नेहमी मिळालेल्या यशासाठी त्यांला शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजेश पाडवी.भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ शशिकांत वाणी. माजी आमदार शरद गावित राजेंद्र गावित जेष्ठ नेते नागेश पाडवी. डॉ कांतीलाल टाटिया माजी जी. प.सदस्य गणेश पराडके. विजय पराडके शहादा येथील माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील. दिपक पाटील अभिजीत पाटील मुन्ना दादा रावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे निखिल तूरखीया . दत्तू साळवी. शिवसेना उपजिल्हाध्यक्ष गौतम जैन हेमलाल मगरे तालुका प्रमुख अनुप उदासी माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय भाजप शहर अध्यक्ष गौरव वाणी. योगेश चौधरी.जहागीरदार अमरजीत दादा बारगळ, डॉ देविदास शेंडे, डॉ किशोर समुद्रे,संजय वाणी, आंबालाल साठे, मगरे,हाजी निसार दादा मकराणी,विरसिंग पाडवी, प्रवीण वलवी, रोहीदास शेंडे, विठ्ठल बागले, गुड्डू वलवी, कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश भारती, ढाकणे सर यांनी परिश्रम घेतले, सुत्रसंचलन प्रा अविनाश मराठे यांनी केले……..

श्री कालीचरण सूर्यवंशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *